लालबागच्या राजाच्या व्हायरल फोटोमागचं वास्तव

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

जून महिना उजाडला तशी मूर्तीकारांची गणेशमूर्तींसाठी लगबग सुरु होते. तशीच ती या वर्षीही सुरु झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचे रुप कसे असेल, याबाबत गणेशभक्तांमध्ये कमालीची उत्सुकता लागून राहिली असतानाच यंदाच्या लालबागच्या राजाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून 2017 मध्ये लालबागच्या राजाचे स्वरुप असे असेल, असा दावा करण्यात येत आहे.


हे देखील वाचा - 

लालबागच्या दरबारात पोलिसांची दादागिरी


दरवर्षी लालबागचा राजाबद्दल गणेश मंडळ आणि गणेश मूर्तीकार गुप्तता पाळतात. पण यंदा सोशल मीडियावर लालबागच्या राजाचा हा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत लालबागच्याच राजाच्या स्वरुपातील गणपतीची मूर्ती दिसत आहे. पण दरवर्षीप्रमाणे या गणेश मूर्तीच्या प्रभावळीत बदल असल्याचे दिसत आहे. यंदाची लालबागच्या राजाची प्रभावळ कृष्णाच्या स्वरुपातील दिसत आहे. गतवर्षी लालबागच्या राजाच्या गणेशमूर्तीच्या प्रभावळीत घुबडाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. पण त्यावरुनही शुभ-अशुभ अशी चर्चा रंगली होती. पण यंदाच्या गणेश मूर्तीत कृष्णाच्या स्वरुपातील प्रभावळ साकारण्याचा दावा या फोटोतून केला जात आहे.

सोशल मीडियावर फिरत असलेल्या फोटोत तथ्य नाही. योग्य वेळी माध्यमांना राजाचे स्वरूप काय असेल ते सांगण्यात येईल.
- अशोक पवार, कार्यकारिणी सदस्य, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

पुढील बातमी
इतर बातम्या