कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे महाराष्ट्रातील तिघे जण इराण बोटीवर अडकले आहेत. या बोटीवरील 30 कर्मचाऱ्यांची संबंधित देशांकडून सुखरुप सुटका करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील या तरुणांची सुटका करण्यात यावी, यासाठी भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविले आहे.
या तरुणांची बोटीतून सुटका करण्यासाठी इराणमधील भारतीय राजदूतांनी प्रयत्न करावेत, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनाही पत्र पाठवून विवेक माळकर यांच्या कुटुंबीयांनी मदतीची विनंती केली आहे.
हेही वाचा -