बेकायदा पार्किंगचा दंड झाला कमी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शहरातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पालिका आणि वाहतूक विभागाने नियमांचे उल्लघंन करण्यास दंडात्मक कारवाई सुरू केली. मात्र मोठ्या प्रमाणात आकारलेल्या या दंडात्मक कारवाईला मुंबईकरांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागल्यानंतर पालिकेने आता दंड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचाः- ढगाळ वातावरणामुळं मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर परिणाम

मुंबई महापालिकेची २९ सार्वजनिक वाहनतळ आहेत. या वाहनतळांची एकूण क्षमता ही साधारणपणे ३० हजार वाहनांची आहे. या वाहनतळांच्या ५०० मीटर परिसरात पार्किंग करणाऱ्यांवर वाहनचालकांवर  जुलै महिन्यांपासून कारवाई करण्यास सुरूवात केली. या कारवाई अंतर्गत नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहन मालकांकडून ५ ते १५ हजार रुपये दंड व टोचन शुल्क वसूल करण्यात येत आहे. मात्र या मागे महसूल प्राप्ती हा उद्देशनसून  चालकांना  शिस्त लावण्याचा उद्देश होता.

मात्र दंडाची रक्कमपाहता मुंबईकरांनी त्याला विरोध दर्शवला. नागरिकांच्या विरोधामुळे पालिकेने गौतम चॅटर्जी यांच्या अध्यक्षतेखाली पार्किंग ऍथोरिटीची स्थापना केली. या ऍथोरिटीने वाहतूक पोलिसांकडून वसूल करण्यात येणाऱ्या दंडापेक्षा पालिकेकडून जास्त दंड आकारला जात असल्याचे निदर्शनास आणले. तसेच दंडाची रक्कम कमी करावी असा सल्ला पालिका आयुक्तांना दिला. पालिकेच्या ज्या पार्किंग परिसरात बेकायदेशीर पार्किंगचे प्रमाण कमी झाले, त्या ठिकाणचा दंड कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, पालिकेच्या ज्या पार्किंग परिसरात बेकायदेशीर पार्किंग आजही होत आहे. त्या ठिकाणी दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी ५ ते १५ हजार रुपये दंड वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

किती वसूल केला जातोय दंड –

अवजड वाहन - १५००० रुपये

मध्यम आकाराची वाहने - ११००० रुपये

छोट्या आकाराची वाहने - १००००रुपये

तीनचाकी वाहने - ८००० रुपये

दुचाकी वाहने - ५००० रुपये

हेही वाचाः -'परे'च्या बम्बार्डियर लोकलच्या वेगात होणार वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या