शिवडीतील गोदामाला भीषण आग

Source: Twitter (Handle: @NJ20005)
Source: Twitter (Handle: @NJ20005)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

शिवडी काॅटन ग्रीन परिसरातील एका गोदामाला सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. ही आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.

येथील लक्ष्मीविलास हाॅटेलजवळील गोदामाला ही आग लागली. अग्नीशमन दलाला ११.३० वाजता या आगीची वर्दी मिळाली. ही आग लेव्हल २ ची असल्याची माहिती अग्नीशमन दलाने दिली. ही आग विझवण्यासाठी ८ फायर इंजिन आणि वाॅटर टँक घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे. या आगीत अद्याप कुणालाही दुखापत झाल्याची माहिती मिळालेली नाही.  

पुढील बातमी
इतर बातम्या