भांडुपमधील कपड्याच्या गोदाऊनला भीषण आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईच्या भांडुप परिसरातील गोडाऊनला भीषण आग लागली आहे. भांडुपच्या सोनापुर इथल्या एल.बी.एस रोडवरील एका कापडाच्या दुकानाला ८.३० वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेत.

अग्निशामक वाहनं, चार जंबो पाण्याचे टँकर, दोन पाण्याचे टँकर, एक बचाव वाहन यांच्यासह घटनास्थळी १० फायर टेंडर आहेत. दुसऱ्या लेवलची ही आग आहे. अहवालानुसार आतापर्यंत कोणतीही जखमी झालेली नाही.

इतर बातम्या