तळोजा एमआयडीसीतील रासायनिक कारखान्याला आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबईमधील तळोजा एमआयडीसीमध्ये आजोप्लास्ट या रासायनिक कारखान्याला मंगळवारी दुपारी भीषण आग लागली. आगीची तीव्रता मोठी असल्याने या परिसरात धूराचे मोठे लोट पहायला मिळत होते. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत.

मंगळवारी दुपारी १२ वाजता ही आग लागल्याचं समजतं. आग कशी लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत. केमिकल ड्रम फुडत असल्याने परिसरात आवाजाने घबराट पसरली आहे. या भीषण आगीमुळे कारखान्याच्या शेजारील कंपन्यांना या आगीची धग लागत आहे.

ही आग रासायनिक कारखान्याला लागली असल्याने काही फॉगिंग इक्विपमेंट यांनी सज्ज असलेल्या विशेष अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. तर कल्याण डोंबिवली आणि मुंबईमधूनही अधिकची कुमक मागवण्यात आली आहे.


हेही वाचा -

मुंबईत सीएनजी, पीएनजी गॅस महागला

लोकलचं सध्याचं वेळापत्रक १५ दिवसांनंतर बदलणार?


पुढील बातमी
इतर बातम्या