फोर्टमधल्या किताब खाना पुस्तकांच्या दुकानात आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बुधवारी सायंकाळी दक्षिण मुंबईतील फोर्ट भागातील एका पुस्तकांच्या दुकानात भीषण आग लागली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट नाही.

संध्याकाळी पाचच्या सुमारास फ्लोरा फाउंटेनजीक सोमय्या भवन इमारतीच्या खालच्या मजल्यावर असलेल्या 'किताब खान' या दुकानाला आग लागल्याची माहिती एका अधिकाऱ्यानं दिली. ते दे देखील म्हणाले की, अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) प्रवक्त्यानं सांगितलं की, “रात्री साडेसहाच्या सुमारास ही आग सर्वत्र पसरली. आग आटोक्यात आणली गेली असून कुलिंगचं काम सुरू आहे. आम्ही ३० नागरिकांना सुरक्षित इमारतीतून बाहेर काढलं आहे”

किताब शहरातील अनेक लोकप्रिय दुकानांपैकी एक आहे. जवळपास १५० वर्षांहून अधिक जुन्या अशा सोमय्या भवनमध्ये किताब खाना हे पुस्तकांचं दुकान आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या