ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये आज सकाळी ८ च्या सुमारास भीषण आग लागली. या आगीचा धूर ठाणे पश्चिम येथील हिरानंदानी इस्टेट परिसरात पसरला होता. आग लागल्याचे वृत्त समजताच तात्काळ अग्निशमन दल, रिजनल डीझास्टर मेंएजमेंट सेंटर यांच्यासोबत फायर इंजिन टॅंकर्स व quick response vehicle दाखल झाले आहेत. सुदैवाने या घटनेमध्ये कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सध्या आग नियंत्रणामध्ये आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.