मुंबई : घाटकोपरमधल्या इमारतीला आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपरमध्ये एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. घाटकोपर पूर्व इथल्या श्रीजी टॉवरमध्ये ही घटना घडली आहे. आग लागल्याची माहिती कळताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आलं आहे. 

घाटकोपर पूर्वमध्ये असलेली श्रीजी टॉवर ही एक रहिवाशी इमारत आहे. संध्याकाळी ६ वाजल्याच्या सुमारास ही आग लागली. आग लागल्याचं कळताच इमारतीमधील रहिवाशी इमारत सोडून बाहेर निघाले. अग्निशमन दलाकडून जवळपास २ तास आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. आगीमध्ये कुठल्याही प्रकारची जिवीतहानी झाली नसून इमारतीतील रहिवासी सुखरुप आहेत.


पुढील बातमी
इतर बातम्या