बोईसरच्या तारापूर MIDC प्लांटला भीषण आग, सलग आठ मोठे स्फोट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

पालघर येथील तारापूर एमआयडीसी प्लांटमध्ये मंगळवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीत आग लागल्यापासून सलग आठ मोठे स्फोट झाले आहेत.

अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. 

आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कंपनीत ज्वलनशील पदार्थांचा मोठा साठा असल्याने ही आग लागल्याचे बोलले जात आहे.

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून जीवित व वित्तहानीबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही. दोन महिन्यांपूर्वी दुसऱ्या केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत कंपनीच्या प्रोडक्ट मॅनेजरचा मृत्यू झाला होता.

पुढील बातमी
इतर बातम्या