चेंबूरमध्ये फुटपाथची दुरवस्था

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

चेंबूर - मोनो रेल्वेचे काम पूर्ण झाल्यानंतर एमएमआरडीए आणि महापालिकेनं चेंबूरमधील आरसी मार्गावर असलेले सर्व फुटपाथ नव्याने तयार बांधले. मात्र दोन वर्षांतच त्यांची दुरवस्था झालीये. अनेक ठिकाणी गटरांची झाकणं तुटलेली आहेत. तर काही ठिकाणी फुटपाथवर लावलेले पेव्हर ब्लॉकही तुटलेत. त्यामुळे पादचाऱ्यांना मोठाच त्रास होतोय. अशा प्रकारचं निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांवर महापालिकेनं कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येतेय.

पुढील बातमी
इतर बातम्या