आचारसंहितेआधी मुंबई चकाचक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबई महानगरपालिका प्रशासनानं सर्व वॉर्डांमध्ये 10 लाख कचऱ्याच्या डब्याचं वितरण करण्याचं जाहीर केलं होतं. पण महापालिका निवडणुका जवळ आल्या, तरी कचऱ्याच्या डब्यांचा पत्ता नाहीये. त्यामुळे संतापलेल्या नगरसेवकांनी मंगळवारी कचऱ्याच्या डब्यांवरून गोंधळ घातला. शिवसेनेच्या युगंधरा साळेकर यांनी हरकतीचा मुद्दा मांडत याबाबतचा सवाल प्रशासनाला विचारला. त्यावर अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी आचारसंहितेआधी सर्व वॉर्डमधील नगरसेवकांना कचऱ्याचे डबे वितरीत केले जातील, असं आश्वासन दिलं. त्यामुळे आचारसंहितेआधी मुंबई चकाचक होणार, अशी चर्चा महापालिकेत होती.

पुढील बातमी
इतर बातम्या