गुढीपाडव्याला राज्य सरकारकडून नियमावली जाहीर, 'असे' आहेत नियम

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी होणाऱ्या गुढीपाडवा सणासाठी राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कोरोनाचं संकट असताना गुढीपाडवा सण साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन राज्य सरकारने केलं आले.

राज्यात कोरोनाचा कहर वाढत आहे. त्यामुळे राज्यात कडक निर्बंध लावण्यात आले असून वीकेण्ड लॉकडाउनही लावला आहे. सणांवरही निर्बंध आले आहेत. यामुळे मंगळवारी होणार गुढीपाडवा सणावरदेखील कोरोनाचं सावट आहे. गुढीपाडव्यासाठी ठाकरे सरकारकडून नियमावली प्रसिद्ध करण्यात आली आहे.

यानुसार, कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी असणार आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ८ पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणं अपेक्षित आहे. तसंच सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.

सोशल डिस्टन्स व स्वच्छतेच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. गुढी पाडव्यादिवशी आरोग्य विषयक उपक्रम राबवावेत. शासनाने कोविड 19 च्या अनुषंगाने दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही आदेशात म्हटले आहे. 

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर  सोने खरेदी केली जाते. मात्र, कोरोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्र संवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय अमलात आणले आहेत. पण सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.



हेही वाचा - 

आणखी ३ नवी कोरोना केंद्रे लवकरच सुरू होणार

'या' वयोगटाला कोरोनाचा सर्वाधिक धोका

पुढील बातमी
इतर बातम्या