पालकांसाठी मार्गदर्शन वर्ग

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपर - पंतनगर परिसरातील वनिता विद्यालयामध्ये पालकांसाठी शनिवारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन केले होते. या वर्गात पालकांना आपल्या पाल्याशी कशा पद्धतीने वागणे गरजेचे आहे, पालकांच्या अपेक्षांमुळे मुलांवर कसा दबाव येतो हे सांगत मुलांशी कसे वागायला हवे याचे मार्गदर्शन करण्यात आले.

जी मुले इंग्रजी माध्यामातून शिक्षण घेतात. ती सर्वच मुले यशस्वी होतात का? असा सवाल करत आपली मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतल्यानंतर यशस्वी होतील, असा पालकांमधील गैरसमज दूर होणे गरजेचे आहे, असे समुपदेशक विष्णू धुरी यांनी या वेळी स्पष्ट केले. वनिता विकास मंडळच्या अध्यक्षा निता दातार आणि शिशू विकास प्राथमिक विद्यालयाच्या मुख्यध्यापिका स्नेहा सुभेदार या देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या.

पुढील बातमी
इतर बातम्या