हँगिंग गार्डन, कमला नेहरू उद्यानाचं रूपडं पालटणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मलबार हिल येथील हँगिंग गार्डन म्हणजेच फिरोजशाह मेहता उद्यान आणि कमला नेहरू उद्यानाचं लवकरच रूपडे पालटणार आहे. या दोन्ही उद्यानाच्या सुशोभिकरणाचा निर्णय मुंबई महानगर पालिकेने घेतला असून यासंबंधीचा प्रस्ताव स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी दिलीय. समोरासमोरील या दोन्ही उद्यानांना पादचारी पुलानं जोडण्यात येणार आहे. तर या दोन्ही उद्यानाचे सौंदर्य आणि उद्यानातून दिसणाऱ्या क्वीन्स नेकलेस पॉईंट, इको पॉईंट आणि एम्फी थिएटर प़ॉईंट या तिन्ही ठिकाणचे सौंदर्य कॅमेर्यात कैद करण्यासाठी येथे व्ह्युईंग गॅलरीही तयार करण्यात येणार आहे. कमला नेहरू उद्यानातील लहान मुलांचे आकर्षण असलेल्या म्हातारीच्या बुटाचे नुतनीकरणही करण्यात येणार आहे.

 

पुढील बातमी
इतर बातम्या