१००० विद्यार्थ्यांची फी केली माफ, शाळेच्या मालकाची दिलदारी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना (Coronavirus) विषाणूचा संसर्ग सुरू झाल्यापासून महाराष्ट्रासह देशात ऑनलाईन शिक्षणावर (Online study) भर दिला जात आहे. पण फी (School Fees) भरण्यासाठी पालकांच्या मागे तगादा लावला. अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे त्यांना फी भरणं शक्य नाही. या काळात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहवं लागतंय.

फिवरूनच शाळा प्रशासन आणि पालकांमधील वाद तर शिगेला पोहचला आहे. कठिण परिस्थितीत एकिकडे शाळा फी भरण्यास बळजबरी करत आहेत. मात्र, या सर्वांना मुंबईतील एक शाळा अपवाद ठरली आहे. या शाळेच्या मालकानं हजार विद्यार्थ्यांची फी माफ करत एक नवा आदर्श जगाच्या समोर ठेवला आहे.

मुंबईतील मालवणी भागातील होली स्टार इंग्लिश स्कूलच्या मालकानं आपल्या शाळेतील ६५% विद्यार्थ्यांकरिता संपूर्ण वर्षाची फी माफ केली आहे. शाळेच्या मालकाचं नाव हुसेन शेख (वय 35) असं आहे. हुसेन हे मालाड-मालवणी भागातील होली स्टार इंग्लिश मीडियम स्कूलचे प्राचार्य आणि मालक आहेत आणि त्यांनी शाळेच्या सुमारे १००० मुलांचे शुल्क माफ केलं आहे.

हुसेन यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना काळ आणि लॉकडाऊन दरम्यान कुटुंबांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे, याचा थेट परिणाम मुलांच्या शिक्षणावर होत आहे. यामुळे त्यांनी शाळेतील १००० विद्यार्थ्यांची शालेय फी माफ केली आहे.

शाळेतील उर्वरित ५०० विद्यार्थ्यांना परवडेल तितकी फी देण्यास सांगितलं आहे. इतकेच नव्हे तर हुसेन हे शाळेत शिकणार्‍या आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांचा घरी रेशन देखील पुरवत आहेत. त्यांच्यानुसार शाळेतील कोणताच विद्यार्थी उपाशी नाही राहिला पाहिजे.

कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी हुसेन यांनी बायकोचे दागिने आणि मुलीच्या नावे एफडीसाठी ठेवलेले ८ लाख रुपये खर्च केले आहेत. या पैशातून ते लोकांच्या घरी रेशन पोहचवत आहेत. हुसेन यांनी आपल्या बायकोला विश्वासात घेत त्यांचे दागिने घाण ठेवले आणि १००० विद्यार्थ्यांची फी माफ केली.

विद्यार्थ्यांना मदत करण्याचे आवाहनही हुसेन यांनी केलं आहे. यासाठी शाळेबाहेर ‘सपोर्ट फॉर स्टूडंट’ डोनेशन बॉक्स बसवण्यात आला आहे. तेथे कोणीही पाहिजे त्या प्रमाणात देणगी देऊ शकतं. हुसेन यांनी देखील आपल्या शाळेत काम करणाऱ्या शिक्षकांना काही दिवस कमी पगारात काम करण्यासाठी विनंती केली आणि विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद होऊ नये, याची काळजी घेतली.


हेही वाचा

वरळीतील अभ्यासगल्ली आणि जांबोरी मैदानाचा होणार कायापालट

मुंबईत उभारलं सर्वात मोठं सार्वजनिक शौचालय, टीव्ही, वायफायची सुविधा

पुढील बातमी
इतर बातम्या