आता घरपोच दारू विक्री बंद, राज्य सरकारकडून निर्णय मागे

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना (Corona) कालावधीत घरपोच मद्य विक्रीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता कोरोना निर्बंध हटवण्यात आल्याने घरपोच मद्य विक्रीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. गेले दोन वर्ष देशासह राज्यावर कोरोनाचे संकट होते. राज्यात कोरोना परिस्थिती गंभीर बनली होती.

कोरोनाला आळा घालण्यासाठी राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले होते. या लॉकडाऊनचा परिणाम हा जवळपास सर्वच उद्योगधंद्यांवर झाला. मद्य व्यवसायालाही कोरोनाचा मोठा फटका बसला. मद्य व्यवसायिकांना दिलासा देण्यासाठी जे परवानाधारक मद्य विक्रेते आहेत, त्यांना घरपोहोच दारू विकण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

कोरोनाव्हायरस लॉकडाऊन दरम्यान सुरू केलेली दारूची होम डिलिव्हरी, महाराष्ट्रात लवकरच बंद केली जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले.

अजित पवार म्हणाले, "कोविड-19 चे रुग्ण कमी झाले असल्याने, आम्ही दारूची होम डिलिव्हरी बंद करू. लॉकडाऊनच्या काळात ही व्यवस्था होती."

या संदर्भात गृह विभागाने उत्पादन शुल्क विभागाला आतापासून होम डिलिव्हरी थांबवण्यासाठी पत्र लिहिले आहे.

लॉकडाऊन दरम्यान, महाराष्ट्र सरकारने होम डिलिव्हरीसाठी अधिसूचना जारी केली होती. केवळ परवानाधारक दारू दुकानांनाच दारू पोहोचवण्याची परवानगी होती.

अधिसूचनेनुसार, मद्य, बिअर, सौम्य मद्य आणि FL-II, FL/BR-II, FL/W-II परवाने असलेली दारू बॉम्बे लिकर नियम 1953 अंतर्गत डिलिव्हरी घरच्या पत्त्यावर वितरित केली जाऊ शकते.


हेही वाचा

अल्टिमेटम संपला, आता दुकानांवर मराठीत पाट्या लावल्या नसतील तर...

पुढील बातमी
इतर बातम्या