रविवारी वांद्रेत गृहनिर्माण संस्था मार्गदर्शन शिबिर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रविवारी वांद्रे पूर्व येथील शासकीय वसाहतीमध्ये गृहनिर्माण संस्था मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. स्वयंपुनर्विकास, सहकारी गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, सहकारी कायदा व उपविधींना अनुसरून सुलभपणे कार्य चालवणं, अभिहस्तांतरण याबाबत गृहनिर्माण संस्थांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. आ. एड. आशिष शेलार यांच्या हस्ते महात्मा गांधी विद्यालयात या शिबिराचे उद्घाटन होणार असून यावेळी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार पूनम महाजन, आमदार अनिल परब प्रमुख हे उपस्थित राहणार आहेत.

दिग्गजांचं मार्गदर्शन

मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या शिबिरात, गृहनिर्माण संस्थांचे कामकाज, सहकारी कायदा व उपविधी, अभिहस्तांतरणबाबत मोफत मार्गदशन होईल. तसंच म्हाडाच्या आर आर बोर्डाचे मुख्याधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा उपनिबंधक के.पी.जेपले, राज्य हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे, प्रसिद्ध आर्किटेक्ट चंद्रशेखर प्रभू, अड. डी.एस. वडेर, प्रणय गोयल मार्गदर्शन करणार आहेत.

काय असतील विषय ?

  • संस्थेचे सभासदत्व, नामांकन आणि व्यवस्थापन
  • सदनिका हस्तांतरण, प्रीमियम आकारणी व बिनभोगवटा शुल्क
  • घटना दुरुस्तीनुसार गृहनिर्माण संस्थांची नवीन निवडणूक कार्यपद्धती
  • कलम १०१ अंतर्गत वसुलीची कार्यपद्धती व अंमलबजावणी
  • घटना दुरुस्तीनुसार मोफा कायदा आणि त्याअंतर्गत अभिहस्तांतरण व मानीव हस्तांतरण
  • अभिहस्तांतरण व स्वयं-पुनर्विकास
  • लेखापरीक्षण, तपासणी व चौकशी


पुढील बातमी
इतर बातम्या