Mumbai rain update: मुंबईत 25 जुलै मंगळवारसाठी IMD चा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

भारतीय हवामान खात्याने (IMD) २५ जुलै रोजी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड यासह इतर जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, जो मुसळधार ते अति मुसळधार पाऊस दर्शवतो.

हवामान खात्याच्या पाच दिवसांच्या अंदाजानुसार, बुधवार, 26 जुलैपासून पावासाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. या दरम्यान येलो अलर्ट देण्यात आला आहे. या आठवड्यात मुंबईत पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

दुसरीकडे, ठाणे, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये गुरुवार 27 जुलैपर्यंत मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे.


हेही वाचा

मुंबईतील 'ही' दोन ठिकाणं पूरमुक्त, पालिकेने यादीतून नावं हटवली

अंधेरी सबवेतील पुराचा सामना करण्यासाठी BMCचा 'हा' आहे प्लॅन

पुढील बातमी
इतर बातम्या