१५ दिवसांच्या अंतरानेच होणार घरगुती गॅस सिलेंडरचं बुकिंग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कोरोना व्हायरसपासून बचावासाठी सरकारने १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या दिवसापासूनच नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पाहायला मिळतंय. नागरिक अत्यावश्य वस्तूंचा साठा करून ठेवत आहेत. यासाठी दुकानांबाहेर गर्दी करत आहेत.

लॉकडाऊनच्या घोषणेनंतर घरगुती गॅस सिलिंडरच्या मागणीमध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं देखील लोकांना घाबरून जाऊन गॅस सिलेंडर बुक न करण्याचे आवाहन केलं होतं. मात्र लोकांनी या आवाहनला प्रतिसाद न दिल्यानं कंपनीने बुकिंगसाठी निश्चित कालावधी ठरवला आहे.

याआधी घरगुती गॅस सिलेंडर बुकिंगसाठी कुठल्या प्रकारची सक्ती नव्हती. मात्र आता इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं निर्णय घेतला आहे की, १५ दिवसांच्या अंतरानेच घरगुती गॅस सिलेंडरचे बुकिंग करता येईल.

कंपनीचे अध्यक्ष संजीव सिंह यांनी देखील नागरिकांना या परिस्थिती घाबरू नये. ही सेवा विना अडथळ्याशिवाय सुरू राहील, असे व्हिडीओमार्फत सांगितलं आहे. तसंच देशात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.


हेही वाचा

भितीनं सिलिंडर बुक करण्याची गरज नाही- इंडियन ऑईल

Bombay IITकडून अॅपची निर्मिती, 'क्वॉरन्टाईन' व्यक्तींवर ठेवणार लक्ष

पुढील बातमी
इतर बातम्या