हा नाला की मृत्यूचा सापळा?

  • जयाज्योती पेडणेकर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मालाड - प्रतापनगर परिसरातील रहिवाशांसाठी नाल्याची संरक्षक भिंत धोकादायक ठरत आहे. नाल्याभोवती 2 फूट संरक्षक भिंत असून उर्वरित ठिकाणी नाला उघडा आहे. हा नाला पुढे जाऊन कुरारच्या मोठया नाल्याला मिळतो. नाला उघडा असून तेथे लहान मुले खेळत असतात. या नाल्यात तोल जाऊन कुणी पडल्यास गंभीर इजा होण्याची शक्यता आहे. तसेच नाल्यात कचरा देखील साचला असून परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नाल्याची भिंत उंच बांधण्याबाबत वारंवार विनंती करूनही त्याबाबत कारवाई करण्यात आली नाही. तसेच पालिका अधिकारी आणि स्थानिक लोक प्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या