कांदिवलीत पहिल्या दिव्यांग उद्यानाचे उद्घाटन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कांदिवलीत पहिले दिव्यांग उद्यान सुरू करण्यात आले आहे. कांदिवलीचे आमदार अतुल भातखळकर यांनी खास दिव्यांग मुलांसाठी बांधलेल्या या अनोख्या प्लेइंग पार्कचे उद्घाटन केले. 

भातखळकरांच्या संकल्पनेने बनवलेले दिव्यांग उद्यान हे पहिले दिव्यांगांसाठी बनवलेले उद्यान आहे. या उद्यानात मुलांना खेळासोबतच उपचार पद्धतींचा देखील अनुभव घेता येईल.

भातखळकर म्हणाले, “विशेष दिव्यांग मुलांसाठी विशेष बाग कधीच बनवली गेली नाही. सर्व सामान्यांसाठी बनवलेल्या उद्यानांमध्ये दिव्यांग मुले खेळू शकत नाहीत. त्यांच्यासाठी विशेष उद्यानांची आवश्यक्ता आहे. हे उद्यान त्यांना त्यांच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडवून आणण्याची संधी देईल.''

उद्यान केवळ विशेष दिव्यांग मुलांसाठी बांधण्यात आले आहे. अपंग नसलेल्या इतर मुलांना उद्यानात प्रवेश दिला जाणार नाही. सेलेब्रल पाल्सी आणि ऑटिझम सारख्या गंभीर परिस्थिती असलेल्या मुलांसाठी उद्यानाची पूर्तता करणे अपेक्षित आहे.


पुढील बातमी
इतर बातम्या