मास्क न वापरणाऱ्यांकडून ५ लाखांचा दंड वसूल, केडीएमसीची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कल्याण डोंंबिवली महापालिकेने एप्रिल ते ऑगस्ट अखेरपर्यंत मास्क न घालता सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली  आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत ५ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

पालिकेने सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुली मोहीम सुरू आहे.  जून ते ऑगस्ट दरम्यान केलेल्या प्रभागनिहाय प्रभागानुसार कारवाईत १/अ  प्रभागात २३२ नागरिकांकडून १,१६,००० रुपये, २/ब प्रभागातील कारवाईत २५७ नागरिकांकडून १,२८,५०० रू., ३ /क प्रभागातील १०६ नागरिकांकडून ५५,००० रू., ४ /जे  प्रभागात ४४ नागरिकांकडून २१,७५० रु., ५/ ड  प्रभागातील १५४ नागरिकाकडुन ७७,००० रू., ७/ ह प्रभागात १३,००० रु., ८/ ग प्रभागात १२,४०० रु., ९/ आय प्रभागातील ६० नागरिकांंकडून १९,९०० रु. तर १० / ई प्रभागात  ४३,५०० रुपये दंड वसूल केला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका आतिरिक्त आयुक्त सुनील पवार यांनी सांगितलं की, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून दंड वसुल करण्याची मोहीम सुरु आहे. कोरोना पार्श्वभूमीवर नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर केला पाहिजे.  

जे दुकानदार आपल्या दुकानामध्ये आलेल्या ग्राहकांच्या बाबतीत सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन करीत नसल्याचे आढळल्यास त्या दुकानदारावर देखील कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन नियमांचे पालन करीत सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.


हेही वाचा

मुंबईत रुग्णदुपटीचा कालावधी दोन महिन्यांवर

लढाई कोरोनाशी: घर ते शास्त्रीनगर रुग्णालय


पुढील बातमी
इतर बातम्या