मास्क न घालणाऱ्यांकडून एका दिवसात १ लाखांचा दंड वसूल, केडीएमसीची कारवाई

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक नागरिक सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क घालत नसल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे पालिकेने अशा नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशानुसार महापालिका प्रभागक्षेत्र अधिकारी यांच्या पथकांनी पोलिसांच्‍या सहकार्याने, सार्वजनिक ठिकाणी वावरतांना मास्क परिधान न करणाऱ्यांकडून मंगळवारी १,१३,५०० रुपये दंड वसूल केला आहे. 

पालिकेच्या या मोहिमे अंतर्गत मंगळवारी दिवसभरात मास्क परिधान न केलेल्या व्यक्तींकडून अ प्रभागक्षेत्रातून १,५०० रु. ब प्रभागक्षेत्रातून रुपये ७,५००, क प्रभागक्षेत्रातून रुपये २१,०००, जे प्रभागक्षेत्रातून रुपये ८,५००, ड प्रभाग क्षेत्रातून रुपये १०,५००, फ प्रभागक्षेत्रातून रुपये १७,०००,  ह प्रभागक्षेत्रातून रुपये ४,५००, ग प्रभागक्षेत्रातून रुपये २१,०००, आय प्रभागक्षेत्रातून रुपये ४,००० आणि ई प्रभागक्षेत्रातून रुपये १८,००० असा एकूण २२७ नागरिकांकडून १,१३,५०० रुपयांचा दंड वसूल करण्‍यात आला आहे.

कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव पाहता नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी वावरतांना आपल्‍या चेहऱ्यावर मास्‍क व कापड परिधान करावे, तसंच महापालिका क्षेत्रातील दुकानदारांनी सायंकाळी ७.०० वाजता दुकाने बंद करुन महापालिकेला सहकार्य करावे असं आवाहन महापालिकेमार्फत करण्‍यात येत आहे. 


 हेही वाचा -  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आरे आंदोलकांवरील आरोप मागे घेण्याचे निर्देश

चेंबूरमध्ये मेट्रो ४ लाईनसाठी १८ झाडं तोडण्यास महापालिकेची परवानगी


पुढील बातमी
इतर बातम्या