कल्याण-डोंबिवलीतील पाणीपुरवठा योजनेला मंजुरी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

कल्याण डोंबिवती महापालिकेत राहणाऱ्या लोकांसाठी दिलासायक बातमी हाती आली आहे. कल्याण-डोंबिवली शहरासाठी अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे.

तब्बल 357 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला उपमुख्यमंत्र्यांनी पाठिंबा दिला. यामुळे महापालिकेत नव्याने समाविष्ट 27 गावांना सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी मदत होणार आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

या योजनेमुळे नव्याने समाविष्ट झालेल्या 27 गावांना दिलासा मिळणार आहे. 357 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. या योजनेला मान्यता मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला शब्द पूर्ण केल्याची भावना नागरिकांना व्यक्त केली.

सध्या कल्याणमध्ये अमृत अभियानांतर्गत पाणीपुरवठा, पर्जन्य जलवाहिनी, नागरी परिवहन आणि हरित क्षेत्र विकास इत्यादी सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे.

तसेच शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सुधारित तांत्रिक बदल प्रस्तावाला राज्यस्तरीय तांत्रिक समिती बैठकीत मंजुरी देण्यात आली.

तसेच राज्यस्तरीय उच्चाधिकार सुकाणू समितीच्या बैठकीमध्ये मंजूरी देण्यात आली होती. या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.


हेही वाचा

स्वच्छता मोहिमेत 11.4 मेट्रिक टन कचरा गोळा

मिरा-भाईंदर पालिकेतील कर्मचाऱ्यांसाठी "वन-क्लिक" हजेरी प्रणाली

पुढील बातमी
इतर बातम्या