भिवंडीतील जिलानी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी ३ लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही आर्थिक मदत देण्यास मान्यता दिली आहे.
भिवंडी तालुक्यातील नारपोली येथील पटेल कंपाऊंड मधील ३ मजली जिलानी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३८ व्यक्तींचा मृत्यू झाला होता. शहरातील धामणकर नाका परिसरात असलेली ही इमारत सप्टेंबर महिन्यात कोसळली होती.
या दुर्घटनेतील मृतांच्या कायदेशीर वारसांस मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून प्रत्येकी रुपये ३ लाख देण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्यानुसार एकूण १ कोटी १४ चौदा लाख रुपयांचं अर्थसहाय्य संबंधित ३८ मृतांच्या नातेवाईकांना जिल्हाधिकारी ठाणे यांच्याकडून वितरीत होणार आहे.
दरम्यान या दुर्घटनेचा संपूर्ण तपास करण्यासाठी ४ सदस्य चौकशी समिती नेमण्यात आली होती. तत्पूर्वी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या प्रभाग तिचे प्रभाग अधिकारी व कनिष्ठ अभियंता यांना निलंबित करण्यात आलं होतं.
इमारत दुर्घटनेनंतर राज्य सरकारकडून ताबडतोब मदतनिधीची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर आता या मदतनिधीला मान्यता देण्यात आली असून मुख्यमंत्री सहायता निधीतून ही आर्थिक मदत दिली जाणार आहे.
(maharashtra government help 3 lakh rupees each for victims relative in bhiwandi jilani building collapse accident)
हेही वाचा-
कोरोना अजून संपलेला नाही; सावधगिरी बाळगा- राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
नियमांचं पालन करा अन्यथा लॉकडाऊनला सामोरं जा, मुख्यमंत्र्यांचा थेट इशारा