कोरोना निर्बंधांमध्ये आज शिथिलता मिळणार?

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र सरकार कोविड-19 निर्बंध शिथिल करण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अध्यादेश सोमवार म्हणजेच २८ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्याची शक्यता आहे.

राज्याच्या मदत आणि पुनर्वसन विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं हा आदेश कसा जारी केला जाऊ शकतो याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे.

सोमवारी सायंकाळपर्यंत तो मुंबई उच्च न्यायालयात ठेवला जाईल. यापूर्वी, २२ फेब्रुवारी रोजी, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला कळवलं होतं की, ते १५ जुलै, १० आणि ११ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केलेली परिपत्रके आणि मानक कार्यप्रणाली (SOP) मागे घेण्यास इच्छुक आहेत.

याद्वारे केवळ संपूर्ण लसीकरण झालेल्या लोकांना मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याची, तसंच मॉल आणि ऑफिसच्या ठिकाणी जाण्याची परवानगी होती.

जनहित याचिकांवरील पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे. दुसरीकडे, रविवारी, २७ फेब्रुवारी रोजी राज्यात १००० कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची नोंद झाली. रविवारी राज्यात १००० रुग्णांची नोंद झाल्यानं एकूण संख्या आता ७,८६५,२९८ झाली आहे.

शिवाय, रविवारी महाराष्ट्रात अतिसंक्रमणक्षम ओमिक्रॉन प्रकाराची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. सध्या, एकूण ४,६२९ ओमिक्रॉन प्रकरणे आहेत. तर ४,४५६ डिस्चार्ज करण्यात आले आहेत.

त्याचप्रमाणे, रविवारी मुंबईत १०३ कोरोनाव्हायरस पॉझिटिव्ह रूग्णांची नोंद झाली. ज्यामध्ये सक्रिय रूग्णांची संख्या ८३८ आहे. विशेष म्हणजे रविवारी या विषाणूमुळे कोणताही मृत्यू झाला नाही.


हेही वाचा

मुंबईत ८ मार्चपर्यंत जमावबंदी, काय सुरू काय बंद?

केंद्राकडून नव्या अनलॉक गाईडलाईन्स जाहीर

पुढील बातमी
इतर बातम्या