ठाणे : रिंग मेट्रोच्या 22 स्थानकांसाठी निविदा काढण्यात येणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (MMRCL)ने ठाण्यातील महत्त्वाकांक्षी रिंग मेट्रो प्रकल्पासाठी स्थानकांचे नियोजन करण्यासाठी सल्लागार नेमण्यासाठी निविदा काढण्याची योजना आखली आहे. याअंतर्गत एकूण 22 स्थानके असतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात हा महत्त्वाकांक्षी रिंग मेट्रो प्रकल्प राबवण्यात येत आहे. घोडबंदर रोड आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाट लोकवस्तीमधील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.

स्टेशनांची यादी येथे आहे:

  • जुने ठाणे
  • नवीन ठाणे
  • रायलादेवी
  • वागळे इस्टेट सर्कल
  • लोकमान्य नगर बस स्थानक
  • पोखरण १
  • उपवन
  • गांधी नगर
  • काशिनाथ घाणेकर सभागृह
  • मानपाडा
  • पाटलीपाडा
  • डोंगरीपाडा
  • विजय नगरी
  • वाघबिल
  • हिरानंदानी इस्टेट
  • ब्रम्हांड
  • आझाद नगर बस स्टॉप
  • मनोरमा नगर
  • कोलशेत
  • बाळकुम नाका
  • साकेत
  • शिवाजी चौक


हेही वाचा

मुंबई-अहमदाबाद मार्गावर 20 डब्यांची वंदे भारत ट्रेन धावणार

रेल्वे प्रवासी नव्या टाईमटेबलच्या प्रतिक्षेतच

पुढील बातमी
इतर बातम्या