मुंबई : पर्यटन स्थळांवर बीएमसी एसी टॉयलेट बांधणार

Representational Image
Representational Image
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिकेने (bmc) पर्यटकांच्या सोयीसाठी 14 वातानुकूलित शौचालये (AC toilet) बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी तीन शौचालयांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. लायन गेट, विधान भवन परिसर, फॅशन स्ट्रीट, बाणगंगा, गिरगाव या पर्यटन स्थळांवर शौचालय बांधण्यात येणार आहेत. 

सर्व शौचालये वातानुकूलित असतील आणि आवश्यक त्या सर्व सुविधा यात असतील. शौचालये बांधण्यासाठी शहर परिसरात 14 ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. यासाठी जिल्हा नियोजन समिती (DPDC) मार्फत निधी उपलब्ध करून दिला जाणार असून 35 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

मुंबई (mumbai) शहरातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येत असतात. मात्र, त्या पर्यटन स्थळांवर चांगल्या अवस्थेत शौचालये नसल्यामुळे पर्यटकांना विशेषत: महिलांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पर्यटनस्थळी शौचालये बांधण्याची सूचना केली होती. त्यानुसार महापालिका प्रशासनाने आता पर्यटन स्थळांवर सुविधांसह वातानुकूलित शौचालये निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील 14 ठिकाणांपैकी दक्षिण मुंबईत पाच , ग्रँट रोड परिसरात 2 , वरळी प्रभादेवीमध्ये 3 , माहीम धारावीमध्ये 2  आणि भायखळा आणि सायन भागात प्रत्येकी एका ठिकाणी ही शौचालये बांधण्यात येणार आहेत. या शौचालयांच्या देखभालीसाठी एटीएम, खाद्यपदार्थांचे स्टॉल तयार करून शौचालयांच्या देखभालीचा खर्च उचलण्याची योजना पालिकेने तयार केली आहे.

पर्यटकांसाठी येथे स्वच्छतागृहे बांधण्यात येणार

  • लायन गेट– 17
  • विधान भवन– 20
  • उच्च न्यायालयासमोरील परिसर– 26
  • फॅशन स्ट्रीट – 14
  • गिरगाव– 20
  • बाणगंगा– 14
  • राणीची बाग– 20
  • हायवे अपार्टमेंट, सायन– 20
  • हाजी अली जंक्शन– 16
  • सिद्धिविनायक मंदिर परिसर, सानेगुरुजी मैदान – 20
  • वरळी लिंक मार्ग – 16
  • माहीम रेती बंदर– 14
  • धारावी– 60
  • फिट रोड– 18


हेही वाचा

मालाडमधील 7 समुद्रकिनाऱ्यांवर स्वच्छता मोहीम राबवणार

लोखंडवाला-यारी रोडला जोडणाऱ्या नवीन पुलासाठी मार्ग मोकळा

पुढील बातमी
इतर बातम्या