अल्टिमेटम संपलं, मनसेचा पहिला स्ट्राईक कल्याण, ठाण्यातील फेरीवाल्यांवर

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मुंबईतील सगळ्या रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाले पुढच्या १५ दिवसांत हटवा, नाहीतर १६ व्या दिवशी मनसे आपल्या स्टाईलने फेरीवाल्यांना हटवेल, असं अल्टिमेटम मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारला दिलं होतं. आता १५ दिवस उलटून गेल्यानंतर १६ व्या दिवशी मनसेने कल्याण आणि ठाणे स्टेशनपासून अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई सुरू केली आहे.

मनसे स्टाईल सुरू

शनिवारी मनसे कार्यकर्त्यांनी कल्याण आणि ठाणे रेल्वे परिसरात बसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांचे स्टॉल तोडून त्यांना तिथून हटवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतही अधिकृत फेरीवाल्यांपेक्षा अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या अधिक आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई व्हावी या मागणीसाठी राज यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट घेतली होती. १५ दिवस उलटून गेल्यानंतरही हे फेरीवाले अजूनही रस्त्यावर बसतात. त्यामुळे मुंबईकरांना चालण्यास मोकळे पदपथ मिळत नसल्याचे म्हणत मनसेने आपल्या स्टाईलने अॅक्शन सुरू केली आहे. आता मुंबईतील मनसेच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


हेही वाचा - 

फेरीवाल्यांनो, १६ वा दिवस धोक्याचा!


पुढील बातमी
इतर बातम्या