महापौरांना 'लाल दिव्या'चा मोह सुटेना, आरटीओने घेतला आक्षेप

  • सचिन धानजी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

व्हिआयपी संस्कृतीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने सरकारी बाबू, राजकीय नेता किंवा मंत्र्यांना 'लाल दिवा' वापरण्यास बंदी घातली आहे. असं असूनही मुंबईच्या महापौरांचा लाल दिव्यावरील मोह सुटता सुटत नसल्याचं दिसत आहे. ताडदेव आरटीओने महापौरांच्या वाहनावरील लाल दिव्यावर आक्षेप घेत महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून हा लाल दिवा कायदेशीर नसल्याचं कळवलं आहे.

दिव्याचा वापर नाही

या पत्राला उत्तर देताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मात्र, हा लाल दिवा केवळ बसवलेला नसून तो कायम झाकलेला असतो. या दिव्याचा कधीही वापर केला जात नाही, असं म्हटलं आहे.

काय म्हटलंय पत्रात?

महापौरांच्या ताफ्यातील वाहनावर बसवलेला लाल दिवा हेरून ताडदेव आरटीओने १३ ऑक्टोबर रोजी महापालिकेच्या कार्यकारी अभियंता (एस डब्ल्यू) यांना पत्र पाठवलं. या पत्रात केंद्र सरकारने १ मे २०१७ ला प्रकाशित केलेल्या अधिसूचनेत लाल दिवा लावण्याच्या यादीत मुंबईच्या महापौरपदाचा समावेश नाही. त्यामुळे या वाहनावर कोणत्याही प्रकारचा लाल दिवा लावणं कायदेशीर नसल्याचं नमूद करण्यात आलं आहे.


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 

पुढील बातमी
इतर बातम्या