मुंबई पोलिसांना कडक उन्हात किंवा पावसात ड्युटी करावी लागते. त्यात त्यांच्या डोक्यावर असणारी गांधी टोपी. या टोपीमुळे हवालदार आणि शिपाई या श्रेणीतील कर्मचाऱ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. गुन्हेगारांच्या मागे धावताना किंवा गर्दीला रोखताना त्यांना आपली टोपी एका हातानं सांभाळावी लागते. पण आता पोलिसांच्या या अडचणीवर एक उपाय शोधण्यात आला आहे. पोलिसांच्या टोपीतच आता बदल झाला आहे. निळ्या रंगाच्या गांधी टोपीऐवजी बेसबॉल स्टाइल कॅप पोलिसांना देण्यात आली आहे.
ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च डेव्हलपमेंटनं ही कॅप निवडण्याआधी अनेक डिझाइन तयार करण्यात आल्या होत्या. प्रत्येक डिझाइनची कॅप पोलिसांना काही दिवसांसाठी घालण्यासही देण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांना सोईस्कर अशा या कॅपची निवड करण्यात आली.
नायगाव आणि पोलिस मुख्यालयाच्या कँटिनमध्ये या कॅपचे वाटप करण्यात आले. या कॅपची किंमत 72 रुपये इतकी आहे.
हेही वाचा