Mumbai Rains : विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू

File photo
File photo
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रविवारी मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसाने मुंबईला अक्षरश: झोडपून काढलं. विक्रोळीत निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बाप लेकांचा समावेश आहे. नागेश रेड्डी (वय ३०) आणि रोहित रेड्डी (वय १०) अशी मृतांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, विक्रोळी पार्क साइट परिसरात टाटा पावर हाऊस ही इमारत आहे. या इमारतीत नागेश रेड्डी सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते.

रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्यांना डबा देण्यासाठी मुलगा रोहित हा परिसरात आला. परंतु पाऊस पडत असल्यामुळे रेड्डी यांनी त्यांच्या मुलाला तिथेच थांबण्यास सांगितले परंतु अचानक या इमारतीचा काही स्लॅब कोसळाला आणि दोघेही या स्लॅबखाली दबले.

स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि बचावपथकाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. बापलेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. दरम्यान, रविवारी रात्रभर मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस सुरू होता.

पावसामुळे अनेक भागात पाणी साचले. परळ भागातील अनेक रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आलं. त्यामुळे मध्यरात्री अनेकांच्या घरात पाणी शिरले. मेट्रोचे काम सुरू असल्याने हे आमच्या घरात पाणी शिरत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला.


हेही वाचा

पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईतील रस्त्यांची कामं पुन्हा लांबणीवर

पुढील बातमी
इतर बातम्या