पावसानं गाठला ३ हजार मिमी पल्ला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईसह उपनगरात पडणाऱ्या मुसळधार पावसानं यंदा मोठा पल्ला पार केला आहे. मुंबईत जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसानं हजेरी लावली. तेव्हापासून गुरुवार ५ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजेपर्यंत पडलेल्या पावासनं ३ हजार मिलीमीटरचा मोठा पल्ला पार केला आहे. तसंच, मागील ५ दिवसात एकट्या सप्टेंबर महिन्याचा सरासरी पाऊस पडला आहे.  

एक महिना शिल्लक 

जून महिन्यापासून ५ सप्टेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत सांताक्रुझ वेधशाळेत तब्बल ३ हजार ७८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसंच, कुलाबा वेधशाळेत २ हजार १६२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाळा संपण्यास आणखी एक महिना शिल्लक असतानाच पावसानं मोठा पल्ला गाठाला

टप्पा गाठला

याआधी २०१० आणि २०१९ सालच्या मान्सून हंगामात पावसानं ३ हजार मिलीमीटर टप्पा गाठला होता. त्यानंतर पुन्हा एकदा पावासानं दमदार हजेरी लावत ३ मिलीमीटरचा पल्ला पार केला आहे


हेही वाचा -

एसटीच्या ताफ्यात आली पहिली इलेक्ट्रीक बस


पुढील बातमी
इतर बातम्या