समुद्रात ८ दिवस मोठी भरती, मुंबईकरांना संतर्कतेचा इशारा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

यंदा निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. जून महिन्याच्या सुरुवातील म्हणजे अगदी १ तारखेलाच संपु्र्ण मुंबईत पावसानं भिजली होती. परंतु, काही दिवसांनंतर मुंबईत पावासानं चांगलीच विश्रांती घेतली. त्यामुळं उकाड्यात मोठी वाढ झाली. तसंच, सध्यस्थितीत मुंबईत सकाळी उन रात्री पाऊस अशी परिस्थिती आहे. मात्र, दिलासादायक पाऊस संपूर्ण जून महिन्यात पडलेला नाही. त्यामुळं जुलै महिन्यात मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.

पावसाची शक्यता वर्तवण्यात आली नसली तरी या काळात तब्बल ८ दिवस समुद्रामध्ये मोठी भरती असणार आहे. या वेळी लाटांची उंची ४.३० मीटरपेक्षा अधिक असणार आहे. त्यामुळं समुद्रकिनारी जाणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसंच, चौपाट्यांवर जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत. समुद्रात साडेचार मीटरपेक्षा मोठी भरती असताना अतिवृष्टी झाल्यास मुंबईत पाणी तुंबते.

यासाठी महापालिकेनं नरिमन पॉइंट, गवालिया टँक, वांद्रे, कुर्ला, बीकेसी, अंधेरी, गोरेगाव, मालाड, बोरीवली या केंद्रांवर आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवली आहे. तसेच १३२ प्रशिक्षित जवान रेस्क्यू ऑपरेशनसाठी आवश्यक असणारी साधनसामग्री घेऊन तैनात आहेत. तर गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई या चौपाट्यांवर ९४ जीवरक्षक तैनात ठेवण्यात आले आहेत.

मोठ्या भरतीचे दिवस

तारीख 

वेळ 

लाटांची उंची

४  

स. ११.३८ 

४.५७मीटर

५  

दु. १२.२३ 

४.६३मीटर

६  

दु. १.०६ 

४.६२ मीटर

७  

दु. १.४६ 

४.५४ मीटर

२१ 

दु. १२.४३ 

४.५४ मीटर

२२  

दु. १.२२ 

४.६३ मीटर

२३  

दु. २.०३ 

४.६६ मीटर

२४  

दु. २.४५ 

४.६१ मीटर


हेही वाचा -

यंदा डासांमुळं होणाऱ्या आजारांमध्ये घट

मुंबईत सलून, ब्युटी पार्लर, मंगल कार्यालयांसाठी नवी नियमावली जाहिर


पुढील बातमी
इतर बातम्या