दक्षिण मुंबईतील इमारतींचा जागतिक वारसा यादीत समावेश

  • मुंबई लाइव्ह टीम & राजश्री पतंगे
  • सिविक

दक्षिण मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसटीएम) स्टेशनपासून ते गेटवे ऑफ इंडिया पर्यंतच्या काही इमारतींना जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे. बहरीनच्या मनामा येथे सुरू असलेल्या युनेस्कोच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.

यामध्ये मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आणि महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाचाही समावेश आहे.

'या'यादीत महाराष्ट्र अव्वल 

दक्षिण मुबईत १९ व्या शतकात बांधकाम करण्यात आलेल्या व्हिक्टोरियन निओ गॉथिक आणि आर्ट डेको इमारतींना या यादीत स्थान मिळालं आहे. याशिवाय भारतात सर्वात जास्त वारसा स्थळांचा मान महाराष्ट्र या एकमेव राज्यानं पटकावलं आहे.

यांचाही यामध्ये समावेश

यापूर्वी महाराष्ट्रातील अजंठा, एलिफंटा, वेरूळ आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसची इमारत इत्यादींचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे. आता दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि कला वास्तूंचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला आहे.

युनेस्कोने केलेल्या या घोषणेमुळे भारतातील ३७ स्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत होणार आहे. यामुळे सर्वात जास्त वारसा स्थळ असलेल्या देशांच्या जागतिक क्रमवारीत भारत ७ व्या क्रमांकावर असेल.


हेही वाचा - 

मुंबई देशातलं सर्वात महागडं शहर!

हार्डवर्कर मुंबईकर!

पुढील बातमी
इतर बातम्या