'शर्म करो कुछ तो काम करो'

  • पूनम कुलकर्णी & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादर - जी उत्तर विभागाच्या महापालिका कार्यालयासमोर मुंबईकरांनी ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ अशा घोषणा देत मोर्चा काढला. मंगळवारी सकाळी 10 ते 12.30 दरम्यान महापालिका कार्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात आला. पालिकेच्या दिरंगाईविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.

रस्ते दुरुस्तीकरण, कचरा, अनधिकृत बांधकाम, फेरीवाल्यांचं अतिक्रमण अशा अनेक समस्यांचा दररोज मुंबईकरांना सामना करावा लागतो. या सर्व प्रश्नांकडे पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत हा मोर्चा काढण्यात आला. ‘फ्री अ बिलियन’ संस्थेच्या पुढाकारानं मुंबईतील ठिकठिकाणच्या पालिका वॉर्ड कार्यालयासमोर ‘शर्म करो, कुछ तो काम करो’ ही मोहीम राबवली जातेय. 18 ते 28 ऑक्टोबर दरम्यान आयोजित या मोहीमेत पालिकेच्या वॉर्ड कार्यालयाबाहेर अभिनव कार्यक्रम करण्यात येणार आहेत. मंगळवारी झालेल्या या मोर्चामध्ये दादरमधील विविध सामाजिक संस्थांनी भाग घेतला होता. यामध्ये अनेक मागण्या करण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व फ्री अ बिलियन या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अपर्णा सुंदरेशन यांनी केले. या वेळी, 'मुंबई शहरातल्या महापालिकेच्या प्रत्येक वॉर्ड ऑफिससमोर, त्या विभागातील समस्या जाणून घेऊन मोर्चा काढणार असल्याचं त्यांनी सांगितलं.'

पुढील बातमी
इतर बातम्या