"लोकांच्या जीवाला धोका" अटल सेतूवरून नाना पटोले आक्रमक

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी आज नवी मुंबईतील  (Navi Mumbai) अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूला भेट देऊन पुलावर पडलेल्या भेगांची पाहणी केली.

महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी शुक्रवारी नवी मुंबईतील अटलबिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा सेवा अटल सेतूला भेट देऊन पुलावर पडलेल्या खड्ड्यांची पाहणी केली. या वर्षाच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या सेतूचे उद्घाटन करण्यात आले होते. 

सेतूची पाहणी करताना पटोले म्हणाले की, या खड्ड्यांमुळे लोकांच्या जीवाला धोका आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL), उर्फ अटल बिहारी वाजपेयी शिवडी- न्हावा शेवा अटल सेतू, भारतातील सर्वात लांब सागरी पूल आहे. 

नवी मुंबईला दक्षिण मुंबईशी जोडणारा हा उड्डाणपूल फार महत्त्वाचा आणि सोयिस्कर आहे. जो 21.8 किमी पर्यंत व्यापलेला आहे. ज्यापैकी 16.5 किमी रस्ता समुद्रावर आहे. द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, दररोज 70,000 हून अधिक वाहनांची ये-जा या उड्डाणपुलावरून होते.

अररिया जिल्ह्यात नव्याने बांधलेला पूल कोसळल्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे, ज्यामुळे बुधवारी बिहारच्या ग्रामीण काम विभागातील तीन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले. 


हेही वाचा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मेट्रोच्या फेऱ्यांमध्ये वाढ

नवी मुंबईत झाडांच्या संख्येत 8 वर्षांत 78% वाढ

पुढील बातमी
इतर बातम्या