नवी मुंबईतील 'या' दोन तलावांचे होणार सुशोभीकरण

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) ने दोन महत्त्वपूर्ण तलावांचे सुशोभीकरण करणार आहे. यासाठी  27 कोटी रुपयांची योजना प्रस्तावित केली आहे. हे AMRUT योजनेद्वारे करण्यात आलेल्या पाच वर्षांच्या करारांतर्गत असेल.

नेरुळ सेक्टर 36 मधील "ज्वेल ऑफ नवी मुंबई" होल्डिंग पॉन्ड आणि कोपरखैरणेच्या सेक्टर 19 मधील होल्डिंग पॉन्डचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पावसाळ्यात नवी मुंबईला पूर येण्यापासून रोखण्यात या दोन्ही तलावांचा मोठा वाटा आहे. 

तलावातील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी देखील या योजनेअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत. थेट पाण्याच्या गुणवत्तेचे निरीक्षण करणारी यंत्रणा उभारण्यात येईल. यात बायोरिमेडिएशन तंत्रज्ञानाचाही वापर केला जाईल. ज्वेल ऑफ नवी मुंबईतील तलावासाठी अंदाजे 17 कोटी आणि कोपरखैरणे होल्डिंग पॉन्डसाठी 10 कोटी इतका खर्च आहे.

तलावाची स्वच्छता आणि गाळ काढण्याचे काम 1.26 कोटी खर्चून केले जाईल. 2.75 कोटी खर्च करून अल्ट्रासोनिक प्रणाली तयार केली जाईल. त्याचा वापर शेवाळांवर प्रक्रिया करण्यासाठी केली जाईल. पाण्याची गुणवत्ता राखण्यासाठी 1.40 कोटी खर्चून बायोरिमेडिएशन तंत्रज्ञान स्थापित केले जाईल.

अहवालानुसार, एन्व्हायर्नमेंट लाइफ फाऊंडेशनचे संस्थापक धर्मेश बराई आणि काही कार्यकर्ते यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. बराई यांच्या मते, योग्य धोरणाने आणि कमी खर्चात होल्डिंग पॉन्ड्सची पुरेशी देखभाल केली जाऊ शकते.


हेही वाचा

राणीची बाग बुधवारी पतेतीच्यादिवशीही सुरू राहणार

ठाण्यातील १५ तलावांचे लवकरच सौंदर्यीकरण होणार

पुढील बातमी
इतर बातम्या