नवी मुंबईचा होणार कायापालट, २०२३ स्वच्छता सर्वेक्षणासाठी तयारी जोमात

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

2022 च्या स्वच्छ सर्वेक्षणात तिसरा क्रमांक मिळवल्यानंतर, नवी मुंबई महानगरपालिकेने (NMMC) 2023 च्या स्वच्छता सर्वेक्षणात अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

NMMC च्या शहर अभियांत्रिकी विभागाने शहरातील आठही वॉर्डांमध्ये सुमारे 20 कोटी रुपयांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये भिंतीवरील पेंटिंगचे नूतनीकरण, नवीन कचराकुंड्या, ड्रेनेज वाहिन्यांसाठी नवीन कव्हर, पाण्याच्या कारंज्यांची देखभाल, पेव्हर ब्लॉक पुन्हा टाकणे, रस्त्याच्या लेनच्या खुणा पुन्हा रंगवणे, झेब्रा क्रॉसिंग इत्यादींचा समावेश आहे.

नेरुळ, त्यानंतर वाशी आणि तुर्भेमध्ये जास्तीत जास्त सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे.

सुशोभीकरण आणि दुरुस्तीचे काम पुढील ३ महिने चालणे अपेक्षित आहे. निविदा काढण्यापूर्वी विभागाने सध्याच्या सुशोभीकरणाच्या कामाची स्थिती जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले होते.

“काही दिवसांपूर्वीच प्रत्येक अभियंत्यांना मागील वर्षी झालेल्या कामांची स्थिती पाहण्यास सांगितले होते. आम्हाला कोणत्या प्रकारचे दुरुस्तीचे काम आवश्यक आहे ते ओळखायचे होते तसेच शहराचा कायापालट होईल अशा संकल्पना देखील सुचवायच्या होत्या,” अभियांत्रिकी विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

NMMC ने गेल्या वर्षी स्वच्छतेत देशात तिसरा क्रमांक पटकावला होता. या वर्षी नागरी संस्था वरच्या क्रमांकावर लक्ष ठेवून आहे आणि त्यांनी एक व्यापक सुशोभीकरण योजना आणली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रत्येक नोड्समध्ये किमान 30 लाख किमतीचे काम हाती घ्यायचे आहे.

शहर अभियंता संजय देसाई म्हणाले, “किरकोळ कामे करण्याऐवजी सर्वसमावेशक निविदा काढण्याचा निर्णय घेण्यात आला ज्यामध्ये स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी सर्व बाबींचा समावेश केला जाईल,” असे शहर अभियंता संजय देसाई यांनी सांगितले.

“शहराला आकर्षक बनवण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यासाठी सरकारने नुकत्याच दिलेल्या सूचनांचे पालन करून सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या वर्षी, आम्ही रेल्वे सारख्या इतर एजन्सी आणि MSRDC ने NMMC अंतर्गत येणाऱ्या भागात अशीच कामे हाती घेण्यावर भर दिला आहे. रेल्वे स्थानके आणि सायन-पनवेल महामार्गाचे सुशोभीकरण करण्यासाठी आम्ही या प्रत्येक एजन्सीसोबत दोन-दोन बैठका घेतल्या,” महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी एचटीला सांगितले.


हेही वाचा

2023 Holiday Calendar: 2023 या नव्या वर्षात 'इतक्या' सार्वजनिक सुट्ट्या, संपूर्ण यादी एका क्लिकवर

mumbai"="" target="_blank">Mumbai Local News: लवकरच हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार">Mumbai Local News: लवकरच हार्बर मार्गाचा बोरिवलीपर्यंत विस्तार

पुढील बातमी
इतर बातम्या