सॅनिटरी नॅपकिनला जीएसटीतून वगळण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महिलांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या सॅनिटरी नॅपकीन्सवर 12 टक्के जीएसटी कर लावण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या जाचक निर्णयाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने सोमवारी मुंबईतील चर्चगेट रेल्वे स्थानका बाहेर स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली होती. हा स्वाक्षरी केलेला बोर्ड बुधवारी राष्ट्रवादीच्यावचीने राज्याचे वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना सुपूर्द करण्यात आला. जीएसटीतून सॅनिटकी नॅपकीन वगळण्याची मागणी यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आली.  या मोहिमेचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले होते. या मोहिमेत मोठ्यासंख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला होता.

सॅनिटरी नॅपकीन्स ही महिलांच्या दृष्टीने जिवनावश्यक वस्तू आहे. एकीकडे सौंदर्यप्रसादने करमुक्त केली जातात, मात्र महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या सॅनिटरी नॅपकीन्सवर कर लावला जातो, ही बाब गंभीर आहे. आज राज्यातील 20 टक्के महिलांना सॅनिटरी नॅपकीन्स म्हणजे काय हेच माहिती नाही, तर आर्थिक कारणांमुळे ग्रामीण भागातील महिला सॅनिटरी पॅड्सचा उपयोग करू शकत नाही, अशी परिस्थिती असताना कर लावून या वर्गाला सॅनटरी नॅपकीन्स वापरण्यावर एकप्रकारे निर्बंध घातला जात आहे. 

आज जगभरात 27 टक्के महिला गर्भाशयाच्या कर्करोगाने ग्रस्त आहेत. त्यामध्ये भारतीय महिलांचे प्रमाण मोठे आहे.त्यामुळे या परिस्थितीतून या महिलांना बाहेर काढण्यासाठी जनजागृतीसोबतच त्यांना परवडतील अशा किमतीत सॅनिटरी नॅपकीन्स उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे सरकारने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करुन सॅनिटरी नॅपकीन्सला जीएसटीतून वगळावे अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.


हेही वाचा -  

12 टक्के जीएसटीने सॅनिटरी नॅपकीन महागणार?

मासिक पाळीवर मोकळेपणानं बोला!


पुढील बातमी
इतर बातम्या