आम्हाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी कधी मिळणार?

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

धारावी - जलवाहिनी गळतीमुळे धारावीच्या एमजी रोड इथल्या रहिवाशांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे स्थनिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

इतरांप्रमाणे आम्हालाही स्वच्छ पाणी पिण्याचा अधिकार आहे, असे म्हणत सोशल मीडियावर फोटो शेअर करत धारावीतले रहिवासी एन. आर. पॉल यांनी महापालिकेने लक्ष देऊन या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी केली आहे. तसेच लवकरच जी उत्तर विभागाचे वॉर्ड ऑफिसर रामकांत बिरादार यांना या जलवाहिनी दुरुस्तीसंदर्भात अर्ज देणार असल्याचं पॉल यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना सांगितलं.

पुढील बातमी
इतर बातम्या