गुड न्यूज ! राज्यात आता वाहतुकीसाठी ई-पासची गरज नाही

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन मार्च महिन्यात सरकारने लाॅकडाऊन जाहिर करत राज्यातअंतर्गत होणाऱ्या प्रवासावर बंदी घातली होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव जसा जसा नियंत्रणात येऊ लागला. त्यानुसार गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्राने दिलेल्या नियमावलीनुसार मुख्यमंत्र्यांची चर्चा करून राज्याअंतर्गत बंदी लवकर उठवणार असल्याची घोषणा केली आहे.  त्यामुळे आता राज्या अंतर्गत प्रवासासाठी आता ई-पासची गरज भासणार नाही.

देशामध्ये सध्या अनलॉक-३ चा टप्पा सुरू आहे. देशातले कंन्टेन्मेंट झोन वगळता इतर भागांतला लॉकडाऊन शिथील करण्यात आलेला आहे. पण महाराष्ट्र सरकारने राज्यातली जिल्हाबंदी अजूनही कायम ठेवलेली होती. त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचं असेल, तर ई-पास गरजेचा आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर राज्य सरकार आता वाहतूकीसाठी लागणारा ई-पास आता हटवण्याच्या तयारीत असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून सांगितले.

हेही वाचाः- गणेशोत्सव काळात गर्दी होता कामा नये- मुख्यमंत्री

त्यामुळे देशात लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर अडकून राहावं लागलेल्या अनेकांना आता त्यांच्या घरी परतता येणार आहे. नुकतेच गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाला सरकारने परवानगी दिली होती. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार आता नागरिकांना राज्याअंतर्गत प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज लागणार नाही. केंद्र  सरकारने जाहिर केलेल्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून लवकरच हे निर्बंध काढून टाकले जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.

हेही वाचाः- Ganpati festival 2020 Live: घरातूनच घ्या बाप्पाचं ऑनलाईन दर्शन

पुढील बातमी
इतर बातम्या