महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने CNG ची किंमत प्रति किलो 1.50ने वाढवली आहे. दरवाढीच्या एका दिवसानंतर, ऑटोरिक्षा संघटनांनी सोमवारी भाडेवाढीची मागणी केली, तर टॅक्सी युनियनने त्यांच्या सदस्यांशी अद्याप यावर चर्चा केलेली नाही.
ऑटो युनियन पहिल्या दीड किलोमीटरचे मूळ भाडे 23 वरून 25 पर्यंत वाढवण्याची मागणी करत आहेत. त्यानंतर प्रत्येक किलोमीटरसाठी, ते 15.33 वरून 16.9 पर्यंत दर वाढवण्यास सांगत आहेत.
ऑटोरिक्षा संघटनांच्या म्हणण्यानुसार, सीएनजी दरवाढीमुळे चालकांचे दररोज 130-150 रुपयांचे नुकसान होईल. इतर खर्चासह ग्राहक किंमत निर्देशांकही वाढला आहे. ऑटोरिक्षाला गॅस भरावा लागतो आणि या भाडेवाढीमुळे चालकांच्या खिशाला फटका बसणार आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाच्या भाड्यात सुधारणा आणि वाढ करण्याची गरज आहे,” असे युनियनचे नेते थॅम्पी कुरियन यांनी सांगितले.
टॅक्सी युनियन्सने सांगितले की, त्यांना देखील मूळ भाडे 28 ते 30ची वाढ हवी आहे, परंतु अंतिम मागणी करण्यापूर्वी ते सदस्यांशी अधिक चर्चा करतील. टॅक्सी युनियनचे नेते प्रेम सिंग म्हणाले की, “वास्तविकता हिच आहे की वर्षानुवर्षे खर्चात वाढ होत आली आहे.
युनियन लवकरच त्यांच्या प्रस्तावासह अधिकृत निवेदन परिवहन विभागाला पाठवणार आहेत. प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सूत्रांनी सांगितले की, भाडेवाढीचा कोणताही प्रस्ताव मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटीकडे (MMRTA) जातो, ज्याची दिलेली कारणे वैध आहेत की नाही याचा अभ्यास करण्यासाठी अनेक बैठका होतात.
MMRTAने ऑक्टोबर 2022 मध्ये ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात अनुक्रमे 2 आणि 3 रुपयाने वाढ केली होती. ऑटो आणि टॅक्सीचे किमान भाडे अनुक्रमे 21 रुपयावरून 23 आणि 25 ते 28 रुपयापर्यंत वाढले आहे.
8 जुलै रोजी, MGL ने जाहीर केले की मुंबई महानगर प्रदेशात (MMR) CNG च्या किमती 73.50/kg वरून 75/kg पर्यंत वाढतील. सीएनजी वाहनांची मागणी वाढत असताना हे दर वाढले आहे. MMR मध्ये 400,000 ऑटोरिक्षा, 500,000 खाजगी कार, 2,400 बस आणि 70,000 टॅक्सी यासह एक दशलक्षाहून अधिक CNG वाहने नोंदणीकृत आहेत.
हेही वाचा