वांद्रे - मतदानासाठी वापरण्यात आलेल्या इव्हीएम मशीनविरोधात सकल ओबीसी समाज संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. मंगळवारी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनादरम्यान निदर्शनेही करण्यात आली.
निवडणूक आयोगाने जनहितार्थ निर्णय द्यावा आणि लोकशाही जिवंत होण्यास सहकार्य करावे, अशी मागणी या वेळी ओबीसी समाजाकडून करण्यात अाली. सकल ओबीसी समाज अध्यक्षा कांचन नाईक जांबोटी, खजिनदार शीला पटेल, उपाध्यक्षा वैशाली महाडिक सय्यद, निसार अली सय्यद, शैलू एन. सी. आर. के. निराळा आदींच्या उपस्थितीत निवेदन सादर करण्यात आले.