रस्त्याची दुरुस्ती होणार तरी कधी?

  • अपर्णा गोतपागर & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

घाटकोपर - नाले सफाईसाठी घाटकोपरच्या पटेल चौकातील यशवंत शेठ जाधव मार्गावर रस्त्याच्या मध्यभागी खड्डा तर खणला. पण कायमस्वरुपी दुरुस्ती करण्याचं सोडून त्या खड्ड्यावर लोखंडी पत्रा टाकला. त्यामुळे वाहनचालक आणि रहिवाशांचे अतोनात हाल होतायंत. याचा परिणाम काही दुकानदारांच्या रोजच्या व्यवहारावरही होतोय. 

यासंदर्भात वॉर्ड ऑफिसच्या अभियंत्यांना विचारले असता ट्रॅफिक पोलिसांच्या परवानगीसाठी हे काम रखडल्याचा दुजारा दिला. जर लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर अपघात होण्याची शक्यता आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या