खड्ड्यात घाला राजकारण !

  • मंगल हनवते & मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबई - मुंबईत खड्ड्यांवरुन सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. बुधवारी खड्ड्यांवरून पालिकेच्या स्थायी समितीत चांगलाच गोंधळ झाला. ऑक्टोबर महिन्यात नव्या रस्त्याचं काम हाती घेण्याचा प्रस्ताव पालिकेत मांडण्यात आला. मात्र विरोधकांनी या मुद्द्यावर थेट सभात्याग केला. काँग्रेस गटनेता प्रवीण छेडा यांनी आत्तापर्यंत खड्ड्यांचा मु्द्दा वारंवार माडला. त्यांच्या मागण्यांना आश्वासनंही मिळाली. मात्र मुदत उलटूनही खड्डे बुजले नसल्यामुळे काँग्रेस आणि इतर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खड्ड्यांपासून मुक्ती मिळण्याची वाट मुंबईकर बघतायत. पण खड्डे बुजवण्याच्या मुद्द्यावर अंमलबजावणीऐवजी राजकारण आणि गदारोळ पहायला मिळू लागलाय.

पुढील बातमी
इतर बातम्या