पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग १३ व्या दिवशी घट

  • मुंबई लाइव्ह टीम & नवनाथ भोसले
  • सिविक

मागील काही दिवस पेट्रोल अाणि डिझेलच्या वाढत्या किमतींनंतर अाता सलग १३ व्या दिवशी ट्रोल अाणि डिझेलचे भाव कमी होत अाहेत. मुंबईत सोमवारी प्रती लिटरला पेट्रोलचा भाव ८४.८१ रुपयांवर अाला अाहे. १० दिवसात पेट्रोल १ रुपये स्वस्त झाले अाहे. तर मागील १३ दिवसात  पेट्रोल १.८५ रुपये स्वस्त झाले अाहे. तर डिझेलचा भाव प्रति लिटर १.३६ रुपये घटला अाहे.

दर अाणखी घटतील ?

रविवारी पेट्रोल २४ पैशानं अाणि डिझेल १८ पैशानं स्वस्त झालं अाहे. अांतरराष्ट्रीय बाजारात

कच्च्या तेलाच्या दरात घट होत अाहे. अागामी काळात कच्च्या तेलाचे भाव अाणखी कमी होण्याची शक्यता अाहे. २२ जूनला होणाऱ्या ओपक देशांच्या बैठकीत कच्च्या तेलाचं उत्पादन वाढवण्याचा निर्णय होऊ शकतो. २२ जूनपर्यंत तेलाच्या भावात वाढ होण्याची शक्यता नसल्याचं तज्ञांचं मत अाहे. जर उत्पादन वाढवण्याचा विचार झाला तर किमती अाणखी कमी होतील. 


हेही वाचा - 

२.२५ लाख शेल कंपन्या निशाण्यावर


पुढील बातमी
इतर बातम्या