काय रे, अलिबागवरून आलायस का? डायलाॅगवरील बंदीची याचिका फेटाळली

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

अलिबागवरून आलायस का?  या डायलॉगवर बंदी आणण्याची मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळली आहे. सर्वच समुदायांच्या लोकांवर विनोद होत असतात. ते फारसे मनावर घ्यायचे नसतात असे म्हणत मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदाराजोग व न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठानं याचिका फेटाळली. 

आपण एखाद्याला हिणवण्यासाठी काय रे अलिबागवरुन आला आहेस का? या डायलॉगचा अनेकदा वापर केला जातो. चित्रपटांमध्ये या डायलाॅगचा वापर केला जातो. त्यामुळे  हा डायलॉग किंवा वाक्य वापरत अलिबागकरांचा अपमान का केला जात आहे ? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात केली होती. अलिबागचे रहिवासी असणाऱ्या राजेंद्र ठाकूर यांनी सिनेमा, नाटके, टीव्ही मालिका, सार्वजनिक सादरीकरणे, स्टँडअप कॉमेडी इत्यादींमध्ये या डायलॉगचा वापर करण्यास बंदी घालावी, अशी विनंती या याचिकेद्वारे केली होती. संता-बंता, मराठी, गुजराती भाषिक यांच्यावरही जोक फिरत असतात. त्यामुळे ते फारसे मनावर न घेता ते जोकप्रमाणेच घ्यायला हवेत, असं म्हणत न्यायालयानेही ही याचिका फेटाळली. 


पुढील बातमी
इतर बातम्या