फोर्ट परीसरात ५ मजली इमारत कोसळली, रेस्क्यू ऑपरेशन सुरू

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मालाडमध्ये इमारत कोसळल्याची घटना ताजी असतानाच मुंबईत आणखी एक इमारत कोसळल्याचं समोरं आलं आहे. फोर्ट परिसरातील ही घटना आहे. ४.३० सुमारात फोर्ट परिसरातल्या लकी हाऊस जवळील इमारत कोसळली आहे.

फोर्ट परीसरातील लकी हाऊस जवळील भानुशाली ही ५ मजली इमारत कोसळली आहे. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं आहे. अग्निशमन दलाच्या ६ गाड्या, १ रेस्क्यू व्हॅन आणि १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आहे. ढिगाऱ्याखाली काही जणं अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

सविस्तर वृत्त लवकरच...

पुढील बातमी
इतर बातम्या